23 ऑगस्ट 2025
Created By: राकेश ठाकुर
दक्षिण अफ्रिका संघ पुढच्या महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. यात वनडे आणि टी20 मालिका खेळेल. यासाठी दक्षिण अफ्रिका संघाची घोषणा केली आहे.
दक्षिण अफ्रिका 2 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर दरम्यान तीन वनडे आणि तीन टी20 सामन्यांची मालिका खेळेल. वनडे संघाची धुरा बावुमा आणि टी20 ची धुरा मार्करमकडे आहे.
टी20 संघात केशव महाराजला बऱ्याच प्रतीक्षेनंतर संधी मिळाली आहे. त्याने नुकताच नंबर एक वनडे गोलंदाज होण्याचा मान मिळाला होता.
केशव महाराजने शेवटचा टी20 सामना नोव्हेंबर 2024 मध्ये खेळला होता. त्यानंतर दोन मालिकेत त्याला संधी मिळाली नव्हती.
डेविड मिलर आणि डोनोवन फरेरा यांना डिसेंबर 2024 नंतर पुन्हा एकदा टी20 संघात सहभागी केलं आहे.
अष्टपैलू मार्को यानसेने आणि वेगवान गोलंदाज लिजाद विलियम्स दुखापतीतून सावरत संघात परतले आहेत.
वनडे मालिकेची सुरुवात 2 सप्टेंबरपासून होईल. तर वनडे मालिका 10 सप्टेंबरपासून असेल.