22 ऑगस्ट 2025
Created By: राकेश ठाकुर
अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिका 2-2 ने बरोबरीत सुटली. या मालिकेत सिराज आणि केएल राहुलने कमाल केली.
केएल राहुलने या मालिकेत जबरदस्त खेळी केली. तसेच 500 हून अधिक धावा केल्या. त्याचं संघात मोलाचं योगदान राहिलं.
मोहम्मद सिराजने आपल्या भेदक गोलंदाजीचं दर्शन घडवलं. शेवटचा कसोटी सामन्यात त्याच्या गोलंदाजीमुळे विजय मिळाला. त्याने मालिकेत एकूण 23 विकेट घेतल्या.
इंग्लंड दौऱ्यावरून परतल्यानंतर आशिया कप स्पर्धेत संधी मिळेल असं वाटतं होतं. पण तसं काही झालं नाही. पण आता त्यांना मैदानात उतरावं लागेल.
देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील दुलीप ट्रॉफी सुरु होणार आहे. यात सहा वेगवेगळ्या झोनचे संघ उतरणार आहेत.
शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी हे स्टार खेळाडू खेळणार आहेत. पण साउथ झोननं तसं काही केलं नाही.
बीसीसीआयने साउथ झोनसह इतरांना पत्र लिहित सांगितलं की कसोटी संघातील खेळाडूंना संघात घ्या.
या झोनमध्ये कर्नाटकच्या केएल राहुल आणि हैदराबादच्या सिराज, तामिळनाडूच्या साई सुदर्श आणि वॉशिंग्टन सुंदर खेळावं लागू शकतं.