भारताकडून सर्वाधिकवेळा शून्यावर बाद झालेले खेळाडू
17 ऑक्टोबर 2024
Created By: राकेश ठाकुर
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताचे पाच खेळाडू शून्यावर बाद झाले.
तुम्हाला माहिती आहे का? आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शून्यावर बाद होणारे पाच फलंदाज कोण आहेत?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा नकोसा विक्रम जहीर खानच्या नावावर आहे. तो 43 वेळा शून्यावर बाद झाला आहे.
दुसऱ्या क्रमांकावर इशांत शर्मा असून तो 40 वेळा शून्यावर बाद झाला आहे.
विराट कोहली या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. विराट कोहली 38 वेळा शून्यावर बाद झाला आहे.
हरभजन सिंग 37 वेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शून्यावर बाद झाला आहे. या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.
अनिल कुंबले या यादीत पाचव्या स्थानी असून 35 वेळा शून्यावर बाद झाला आहे.