20 ऑगस्ट 2025
Created By: संजय पाटील
माजी सलामीवीर के श्रीकांत यांनी भारतीय संघावर निशाणा साधला आहे. श्रीकांत यांनी संघातील संतुलनावरुन प्रश्न उपस्थित केले आहेत.
टीम इंडिया आशिया कप जिंकू शकते. मात्र आयसीसी स्पर्धेत जिंकणं अवघड आहे.
टीम इंडिया आशिया कप जिंकेल, असं होऊ शकतं. मात्र ज्या खेळाडूंची निवड करण्यात आलीय ते वर्ल्ड कप जिंकून देऊ शकत नाही, असं श्रीकांत यांनी म्हटलं.
श्रीकांत यांच्यानुसार भारतीय संघात संतुलनाचा अभाव आहे. श्रीकांत यांनी हर्षित राणा याच्या निवडीवरुन आक्षेप घेतला.
श्रीकांत यांच्यानुसार, शिवम दुबे याच्या जागी वॉशिंग्टन सुंदर याला संधी द्यायला हवी होती कारण तो आठव्या क्रमांकासाठी योग्य आहे.
आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. सूर्यकुमार यादव भारताचं कर्णधारपद सांभाळणार आहे. तर शुबमन गिल याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी आहे.
शुबमनला संधी देऊन उपकर्णधार करण्याबाबत अनेकांनी आक्षेप घेतला आहे. शुबमनच्या जागी यशस्वी जैस्वाल याला घ्यायला हवं होतं, असं अनेकांचं म्हणणं आहे.