23 फेब्रुवारी 2025
कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली, पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला महत्त्वाचा टप्पा
भारतीय चायनामन कुलदीप यादवने पाकिस्तानविरुद्ध चांगली गोलंदाजी केली. यादरम्यान त्याची हॅटट्रिक हुकली.
पाकिस्तानविरुद्ध 44व्या षटकातील चौथ्या चेंडूवर सलमान आगा आणि पाचव्या चेंडूवर शाहीन आफ्रिदीला बाद केले. शेवटच्या चेंडूवर विकेट घेता आली नाही.
शाहीन आफ्रिदीला बाद केल्यानंतर कुलदीप यादवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 300 बळीही पूर्ण केले आहेत.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात कुलदीप यादवने 9 षटकात 40 धावा देत 3 बळी घेतले.
कुलदीप यादवने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या 6 सामन्यात 15 विकेट्स घेतल्या आहेत.
कुलदीप यादवची पाकिस्तानविरुद्धच्या वनडेतील सर्वोत्तम गोलंदाजी म्हणजे 25 धावा देत 5 गडी बाद केले.
कुलदीपने पोर्ट ऑफ स्पेन येथे 23 जून 2017 रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे पदार्पण केले होतं.