टी20 वर्ल्डकपमध्ये हा भारतीय खेळाडू होणार हिट!

30 मे 2024

Created By : राकेश ठाकुर

टी20 वर्ल्डकपसाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. यासाठी जोरदार सराव सुरु आहे.

टीम इंडियाने न्यूयॉर्कमध्ये सराव सुरु केला आहे. यासाठी संघाने नेटमध्ये चांगलाच घाम गाळला.

टीम इंडियाला जेतेपदावर नाव कोरायचं असेल तर चांगली कामगिरी करण्याची गरज आहे. 

विराट, सूर्यकुमार आणि रोहित शर्माला धावा कराव्या लागतील. तर बुमराहला विकेट घ्यावे लागतील. 

चार पैकी एकही खेळाडू आपल्याला सिद्ध करू शकणार नाही, असं समालोचक इयान बिशप याचं म्हणणं आहे.

टी20 वर्ल्डकपध्ये इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर सर्वाधिक धावा करेल, असं इयान बिशप यांनी सांगितलं. 

गोलंदाजीत फिरकीपटू कुलदीप यादव कमाल करू शकतो. सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरेल, असं बिशप यांनी सांगितलं.