26 ऑगस्ट 2025
Created By: संजय पाटील
आशिया कप 2025 स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघ आपला पहिला सामना 10 सप्टेंबरला यूएई विरुद्ध खेळणार आहे.
भारतासाठी आशिया कप स्पर्धेत अनेक खेळाडूंनी विक्रमी खेळी केली आहे. त्याच जोरावर भारताने सर्वाधिक 8 वेळा ही ट्रॉफी जिंकली आहे.
भारताच्या एकूण 10 फलंदाजांनी या स्पर्धेत 500 पेक्षा अधिक धावा केल्यात. तर 9 गोलंदाजांनी 15 पेक्षा अधिक विकेट्स घेतल्यात. मात्र एका खेळाडूने 500 धावा आणि 15 विकेट्सही घेतल्या आहेत.
माजी दिग्गज सचिन तेंडुलकर याने आशिया कप स्पर्धेत 500 पेक्षा अधिक धावा आणि 15 पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत. सचिनने आशिया कप स्पर्धेत एकूण 971 धावा केल्या आहेत.
तसेच सचिनने आशिया कप स्पर्धेत बॉलिंगनेही आपली कमाल दाखवलीय. सचिनने या स्पर्धेत एकूण 17 विकेट्स घेतल्यात.
सचिनने आशिया कप स्पर्धेत एकूण 23 सामने खेळले आहेत.
तसेच सचिनने या 23 सामन्यांमध्ये 2 शतकं झळकावली होती. सचिनने या स्पर्धेत ऑलराउंड कामगिरी केली होती.