आशिया कप स्पर्धेपूर्वी  लिट्टन दासला नंबर 1 चा मिळाला मान, झालं असं की...

4 सप्टेंबर 2025

Created By:  राकेश ठाकुर

बांगलादेशचा टी20 कर्णधार लिट्टन दास याने नेदरलँडविरुद्द कमाल केली. तिसर्‍या सामन्यात अर्धशतक ठोकत एक विक्रम नावावर केला. 

लिट्टन दासने अर्धशतकी खेळी करताच बांगलादेशसाठी टी20 मध्ये सर्वाधिक अर्धशतकं ठोकणारा फलंदाज ठरला आहे. 

लिट्टन दासने शाकिब अल हसनला मागे टाकलं आहे. त्याने बांगलादेशसाठी टी20 आंतरराष्ट्रीयमध्ये 13वेळा 50हून अधिक धावा केल्या आहेत. 

लिट्टन दासने 108 डावात 50 हून अधिक धावा केल्या आहेत. यासह बांगलादेशचा नंबर 1 खेळाडू ठरला आहे.

आशिया कप स्पर्धेपूर्वी लिट्टन दास फॉर्मात आहे. त्याने नेदरलँडविरुद्ध 3 सामन्यात 145 धावा केल्या.

लिट्टन दासची टी20 मालिकेत सरासरी 145 आणि स्ट्राईक रेट 155 पेक्षा जास्त आहे. त्याने 6 षटकार आमि 14 चौकार मारले. 

बांगलादेशने नेदरलँडविरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका खिशात घातली आहे. आता आशिया कप स्पर्धेतील कामगिरीकडे लक्ष आहे.

कोहलीसमोर बीसीसीआय नमलं? लंडनमध्येच दिली फिटनेस टेस्ट