3 सप्टेंबर 2025
Created By: संजय पाटील
लिटन दास याने नेदरलँड्स विरुद्ध तिसऱ्या टी 20I सामन्यात अर्धशतक झळकावलं. लिटनने यासह खास विक्रम केला आहे.
लिटन बांगलादेशसाठी टी 20I क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 50 पेक्षा अधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.
लिटनने याबाबतीत शाकीब अल हसन याचा विक्रम मोडीत काढला. शाकिबने बांगलादेशसाठी 13 वेळा 50 पेक्षा अधिक धावा केल्या होत्या.
लिटनने अवघ्या 108 डावात शाकिब अल हसन याचा विक्रम मोडीत काढला आहे. शाकिब यासह बांगलादेशचा नंबर 1 फलंदाज ठरला आहे.
लिटनने आशिया कप स्पर्धेआधीच नेदरलँड्स विरूद्धच्या 3 टी 20I सामन्यांमध्ये एकूण 145 धावा केल्या आहेत.
लिटनने टी 20I मालिकेत 145 च्या सरासरीने आणि 155 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. लिटनने या दरम्यान 6 षटकार आणि 14 चौकार लगावले.
बांगलादेशने नेदरलँड्स विरुद्ध 3 सामन्यांची टी 20I मालिका जिंकली. त्यामुळे आता बांगलादेश आशिया कप स्पर्धेत कशी कामगिरी करते? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.