फक्त 50 रुपयात पाहता येणार टीम इंडियाच्या खेळाडूंचा सामना Live
16 ऑगस्ट 2024
Created By: राकेश ठाकुर
दिल्ली प्रीमियर लीग स्पर्धेला 17 ऑगस्टपासून सुरुवा होणार आहे. या पर्वात सहा संघ खेळणार आहेत.
दिल्ली प्रीमियर लीगमध्ये ऋषभ पंत, हर्षित राणा, नवदीप सैनी आणि इशांत शर्मासारखे दिग्गज खेळाडू आहेत.
पहिला सामना पुरानी दिल्ली 6 आणि साउथ दिल्ली सुपरस्टार्स यांच्यात होणार आहे. पुरानी दिल्लीकडून पंत आणि इशांत शर्मा खेळणार आहेत.
दिल्ली प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्या लाडक्या खेळाडूंना प्रत्यक्ष पाहण्याची संधी क्रीडारसिकांना आहे.
दिल्ली प्रीमियर लीगचं सर्वात स्वस्त तिकीट हे 50 रुपये आहे. त्यामुळे मैदानात चांगलीच गर्दी असेल.
पुरानी दिल्ली 6 आणि साउथ दिल्ली सुपरस्टार्स यांच्यातील पहिला सामना रात्री 8.30 वाज सुरु होईल.
लीगमधील इतर सामने दुपारी 2 आणि संध्याकाळी 7 वाजता असणार आहेत.