आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी रोहित शर्माला घेण्यास हा संघ तयार! खुद्द प्रशिक्षकाने केला खुलासा
31ऑगस्ट 2024
Created By: राकेश ठाकुर
आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी मेगा लिलाव पार पडणार आहे. रोहित शर्माला रिलीज करणार की रिटेन हे अजून गुलदस्त्यात आहे.
मागच्या पर्वात मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरून दूर केलं होतं. त्यामुळे रोहित शर्मा वेगळी वाट धरू शकतो.
मुंबई इंडियन्सने रिलीज केलं तर रोहित शर्मा ऑक्शनमध्ये दिसेल. त्याला संघात घेण्यासाठी फ्रेंचायझींमध्ये चढाओढ दिसेल यात शंका नाही.
लखनौ सुपर जायंट्सचे फिल्डिंग कोच जॉन्टी ऱ्होड्सने सांगितलं की, रोहित लिलावात आला तर लखनौ त्याचं स्वागत करेल.
एका रिपोर्टनुसार, लखनौने रोहितला घेण्यासाठी 50 कोटींचं वेगळ बजेट ठेवले आहे.
रोहित शर्मा 2011 पासून मुंबई इंडियन्ससोबत आहे. तसेच कर्णधार म्हणून पाचवेळा जेतेपद मिळवून दिलं आहे.
मुंबई इंडियन्सने आयपीएल 2022 पूर्वी रोहित शर्माला 16 कोटींना रिटेन केलं होतं. आता रिटेन करणार की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.