टीम इंडियात बरेच कॅप्टन..! असिस्टंट कोच अभिषेक नायर काय बोलून गेले
26 सप्टेंबर 2024
Created By: राकेश ठाकुर
भारत आणि बांगलादेश यांच्यात दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबरपासून कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे.
सामन्यापूर्वी असिस्टंट कोच अभिषेक नायर पत्रकार परिषदेला सामोरे गेले. यावेळी त्यांनी एक वेगळच मत मांडलं.
अभिषेक नायर यांना विचारलं गेलं की संघात उपकर्णधार का नाही? तेव्हा त्यांनी सांगितलं टीम इंडियात बरेच कर्णधार आहेत.
अभिषेक नायर यांनी सांगितलं की, ग्रीन पार्कच्या कोणत्या खेळपट्टीवर सामना होणार हे माहिती नाही. तिथे दोन खेळपट्ट्या तयार केल्या आहेत.
कानपूरची खेळपट्टी पाहिल्यानंतरच प्लेइंग इलेव्हनबाबत निर्णय घेतला जाईल, असं अभिषेक नायर यांनी सांगितलं.
कानपूर कसोटीत टीम इंडिया 3 फिरकीपटूंसह उतरू शकते. येथे खेळलेल्या मागच्या सामन्यातही टीम इंडियाने असंच केलं होतं.
तीन फिरकीपटू खेळवण्याचा निर्णय घेतला तर आकाश दीप किंवा मोहम्मद सिराजला बसवलं जाऊ शकतं. त्या ऐवजी संघात कुलदीप किंवा अक्षरला स्थान मिळेल.