22 ऑगस्ट 2025
Created By: राकेश ठाकुर
दक्षिण अफ्रिकेचा युवा फलंदाज मॅथ्यू ब्रेटझ्कीने क्रिकेटविश्वात नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. त्याच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं.
ब्रेटझ्कीने दुसऱ्या वनडे सामन्यात 78 चेंडू 88 धावा केल्या. त्याच्या खेळीमुळे 277 धावांपर्यंत मजल मारता आली. तसेच ऑस्ट्रेलियाचा 84 धावांनी पराभव झाला.
ब्रेटझ्कीने 88 धावांसह एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. करिअरच्या पहिल्या चार सामन्यात सलग चार अर्धशतकं ठोकली आहे.
ब्रेटझ्कीने पहिल्या चार वनडे सामन्यात 378 धावा ठोकल्या. हा एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे.
ब्रेटझ्कीने अशी कामगिरी करत कर्णधार टेम्बा बावुमाचा विक्रम मोडला आहे. त्याने पहिल्या चार वनडेत 4 अर्धशतकांसह 280 धावा केल्या होत्या.
ब्रेटझ्कीने वनडे सामन्याच्या डेब्यूतच 150 धावांची खेळी केली होती. पदार्पणाच्या सामन्यात इतकी मोठी खेळी करणारा पहिला फलंदाज ठरला.
ब्रेटझ्कीची वनडे सरासरी 94.5 इतकी आहे. त्याचा स्ट्राईक रेट 100 पेक्षा अधिक आहे.