मॅक्सवेलने शतक ठोकत मोडला बाबर आणि राहुलचा विक्रम

30 November 2023

Created By: Rakesh Thakur

भारताविरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने नाबाद 104 धावा केल्या.

मॅक्सवेलने 48 चेंडूत 8 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने 104 धावांची खेळी केली.

शतक झळकावून मॅक्सवेलने बाबर आझम आणि केएल राहुलचा मोठा विक्रम मोडला.

टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक तीन शतके ठोकणारा फलंदाज ठरला आहे.

बाबर आझम, केएल राहुल आणि मोहम्मद वसीम यांनी धावांचा पाठलाग करताना प्रत्येकी 2 शतके झळकावली आहेत.

दुसरीकडे, मॅक्सवेलने त्याचा माजी सहकारी एरॉन फिंचचा विक्रमही मोडला आहे.

मॅक्सवेलने आतापर्यंत टी-20 मध्ये भारताविरुद्ध 554 धावा केल्या आहेत. फिंचने या फॉरमॅटमध्ये भारताविरुद्ध 500 धावा केल्यात.