मोहम्मद शमीने मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार, म्हणाला..
20 November 2023
Created By: Rakesh Thakur
मोहम्मद शमीने ट्वीट करत सांगितलं की, दुर्दैवाने काल आमचा दिवस नव्हता.
'संपूर्ण स्पर्धेत आमच्या संघाला आणि मला पाठिंबा दिल्याबद्दल मी सर्व भारतीयांचे आभार मानू इच्छितो.'
'पंतप्रधानांचे आभार विशेषत: ड्रेसिंग रूममध्ये येऊन आमचा उत्साह वाढवल्याबद्दल.'
आम्ही बाउन्स बॅक करू! असा विश्वास मोहम्मद शमीने व्यक्त केला.
मोहम्मद शमी याने वर्ल्डकप स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली.
मोहम्मद शमीने 7 सामन्यात 24 गडी बाद केले.
ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात भारताचा 6 गडी राखून पराभव केला.