मोहम्मद सिराजचा तेलंगाणा सरकारकडून सन्मान, बक्षीस म्हणून मिळालं...
9 July 2024
Created By: Rakesh Thakur
टी20 वर्ल्डकप विजयानंतर टीम इंडियाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर मुंबईत चाहत्यांनी जल्लोष स्वागत केलं.
स्वागतानंतर टीम इंडियावर बक्षिसांचा वर्षाव सुरु झाला आहे. खेळाडूंचा त्या त्या राज्यात सन्मान होत आहे.
मोहम्मद सिराजचं त्याच्या घरी हैदराबादला जल्लोषात स्वागत झालं. यावेळी चाहत्यांनी एकच गर्दी केली होती.
सिराजचं तेलंगाणा सरकारकडून खास सन्मान करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी त्याचं निवासस्थानी गौरव केला.
सिराजने मंगळवारी मुख्यमंत्री रेड्डी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी एक खास मूर्ती आणि शाल घालून सत्कार केला. तसेच बक्षिसाची घोषणा केली.
तेलंगाणाचा नाव मोठं केल्याने मुख्यमंत्र्यांनी सिराजला सरकारी नोकरी आणि हैदराबादमध्ये एक प्लॉट देण्याची घोषणा केली.
महाराष्ट्र सरकारनेही रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल यांचा सन्मान करून 11 कोटी रुपये दिले होते.