शमीचा दक्षिण अफ्रिका दौऱ्यातून पत्ता कट होणार! नेमकं काय झालं?

6 December 2023

Created By: Rakesh Thakur

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतग्रस्त पायाने संपूर्ण वनडे वर्ल्डकप खेळला होता.

मोहम्मद शमीसाठी विश्वचषक अत्यंत संस्मरणीय ठरला. त्याने सात सामन्यांत 24 बळी घेतले.

त्याची कामगिरी पाहून शमी दुखापतीमुळे त्रस्त होता याचा अंदाज कोणालाच आला नाही.

क्रिकबझच्या वृत्तानुसार, संपूर्ण विश्वचषकादरम्यान शमी त्याच्या टाचेच्या दुखापतीमुळे त्रस्त झाला होता.

गोलंदाजी करताना लँड करताना त्याला अडचण येत होती. मात्र, त्याचा त्याच्या कामगिरीवर परिणाम झाला नाही.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी शमी याबाबत गांभीर्याने विचार करत आहे.

बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी शमीची संघात निवड केली आहे.

कसोटी मालिकेच्या निवडीवेळीही फिटनेस चाचणीनंतरच त्याची उपलब्धता ठरवली जाईल, असे सांगण्यात आले होते.