सर्वाधिक आशिया कप ट्रॉफी जिंकणारी टीम, नंबर 1 कोण?

20 ऑगस्ट 2025

Created By:  संजय पाटील

आशिया कप 2025 स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. या 8 संघांना 4-4 नुसार 2 गटात विभागण्यात आलं आहे. 

आतापर्यंत आशिया कप स्पर्धेच्या इतिहातील सर्वात यशस्वी संघ कोणता? कोणत्या संघाने सर्वाधिक वेळा आशिया कप जिंकला आहे?

भारतीय संघाने सर्वाधिक वेळा आशिया कप जिंकला आहे. आतापर्यंत 16 वेळा आशिया कप स्पर्धा खेळवण्यात  आली आहे. भारताने त्यापैकी 8 वेळा या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.

भारताने 1984, 1988, 1990-91, 1995, 2010, 2016, 2018 आणि 2023 मध्ये ही ट्रॉफी जिंकलीय.

भारतानंतर श्रीलंकेने सर्वाधिक 6 वेळा ट्रॉफी जिंकलीय. श्रीलंकेने 1986, 1997, 2004, 2008, 2014 आणि 2022 साली ही ट्रॉफी उंचावली होती.

पाकिस्तानने 2000 आणि 2012 साली अशा फक्त 2 वेळाच आशिया कप ट्रॉफीवर नाव कोरलं.

भारत, श्रीलंका आणि पाकिस्तान या 3 संघांव्यतिरिक्त एकाही संघाला आशिया कप ट्रॉफी जिंकता आलेली नाही.

अनाया बांगर दिसणार नव्या भूमिकेत, अखेर घेतला मोठा निर्णय