वनडेमध्ये जास्त शतक ठोकणाऱ्या फलंदाजांची यादी

या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे. सचिनने 463 वनडे सामन्यांमध्ये 49 शतक केले आहेत.

सचिननंतर विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराटने 288 वनडे सामन्यांमध्ये 48 शतक केले आहेत.

सचिनच्या रेकॉर्डची बरोबरी करण्यासाठी विराटला फक्त एका शतकची गरज आहे.

विशेष म्हणजे या यादीत तिसरा खेळाडूदेखील भारताचाच आहे. हिटमॅन रोहित शर्मा या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

रोहितने 258 वनडे सामन्यांमध्ये  31 शतक केले आहेत.

या यादीत चौथ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज रिकी पोंटिंगचा नंबर लागतो. त्याने 375 वनडे सामन्यांमध्ये 30 शतक केले आहेत.

या यादीत पाचव्या क्रमांकावर श्रीलंकेचा खेळाडू सनथ जयसूर्या याचा नंबर लागतो. त्याने 445 वनडे सामन्यांमध्ये 28 शतक केले आहेत.

भोजपुरी क्वीनने असा साजरा केला करवा चौथ, पाहा फोटो