टी 20 आशिया कपमध्ये भारतासाठी रोहित-विराटव्यतिरिक्त सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

9 सप्टेंबर 2025

Created By:  संजय पाटील

यूएईमध्ये 9 सप्टेंबरपासून आशिया कप 2025 स्पर्धेला सुरुवात झाली. तर भारतीय संघाचा या स्पर्धेतील पहिला सामना 10 सप्टेंबरला यूएई विरुद्ध होणार आहे.

भारतासाठी टी 20 आशिया कप स्पर्धेत विराट कोहली याने सर्वाधिक 429 धावा केल्या आहेत. तर रोहितच्या नावावर 271 रन्स आहेत.

विराट आणि रोहित या दोघांनी टी 20I क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. त्यामुळे या दोघांव्यतिरिक्त टी 20 आशिया कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा सक्रीय फलंदाज कोण?

टीम इंडियाचा टी 20 कॅप्टन सूर्यकुमार यादव याने टी 20 आशिया कपमधील 5 सामन्यांमध्ये 139 धावा केल्या आहेत.

सूर्यानंतर या यादीत ऑलराउंडर हार्दिक पंड्या याचा नंबर आहे. हार्दिकने टी 20 आशिया कप स्पर्धेत सर्वात जास्त धावा केल्या आहेत.

हार्दिकने टी 20 आशिया कप स्पर्धेतील 8 सामन्यांमधील 6 डावात 83 धावा केल्या आहेत. 

सूर्या आणि हार्दिक व्यतिरिक्त भारताच्या इतर फलंदाजांची टी 20 आशिया कप स्पर्धेत खेळण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे.

आशिया कप 2025 पूर्वी संजू सॅमसनने केली मोठी घोषणा