राशीद खानच्या बॉलिंगवर सर्वाधिक धावा करणारे फलंदाज, सूर्या कितव्या स्थानी?

13 ऑगस्ट 2025

Created By:  संजय पाटील

राशीद खानच्या बॉलिंगवर टी20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज कोण तुम्हाला माहितीय?

राशीद खानची धुलाई करत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत भारताच्या दोघांचा समावेश आहे.

इंग्लंडच्या लियाम लिविंगस्टोन याने राशीदच्या बॉलिंगवर एकूण 102 चेंडूत 200 धावा केल्या आहेत. तसेच राशीदने लियामला 4 वेळा आऊट केलं आहे.

दुसऱ्या स्थानी किरॉन पोलार्ड विराजमान आहे. पोलार्डने राशीद विरुद्ध 133 बॉलमध्ये 125 धावा केल्या आहेत. राशीदने पोलार्डला 3 वेळा आऊट केलं आहे.

सूर्यकुमार यादव या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. सूर्याने राशीद विरुद्ध किती धावा केल्या आहेत?

सूर्याने राशीदच्या बॉलिंगवर  84 बॉलमध्ये 124 धावा केल्या आहेत. राशीद सूर्यकुमारला टी 20 मध्ये एकदाही आऊट करु शकला नाहीय.

संजू सॅमसन याने राशीद विरुद्ध 108 बॉलमध्ये  121 धावा केल्या आहेत. राशीद संजूला टी 20 मध्ये फक्त एकदाच आऊट करु शकला आहे.

न्यूझीलंडने कसोटी इतिहासातील तिसरा सर्वात मोठा विजय नोंदवला