2025 वर्षात आतापर्यंत सर्वात जास्त षटकार लगावणारे सलामीवीर फलंदाज

27 ऑगस्ट 2025

Created By:  संजय पाटील

2025 वर्षात आतापर्यंत सर्वात जास्त षटकार लगावण्याचा विक्रम पाकिस्तानी बॅट्समनच्या नावावर आहे.

पाकिस्तानचा ओपनर साहिबजादा फरहान याने टी 20 मध्ये सर्वाधिक 77 षटकार लगावले आहेत.

अभिषेक शर्मा याने आतापर्यंत 50 षटकार लगावले आहेत. साहिबजादा आणि अभिषेक यांच्यात 27 षटकारांचा फरक आहे. 

साहिबजादा फरहान याला आशिया कप स्पर्धेसाठी पाकिस्तान संघात संधी देण्यात आली आहे. 

न्यूझीलंडचा ओपनर फिन एलेन याने आतापर्यंत 65 षटकार लगावले आहेत.

ऑस्ट्रेलियाचा ओपनर मिचेल ओवन याने 55 षटकार लगावले आहेत.

बांगलादेशच्या तंझीद हसन याने 2025 वर्षात आतापर्यंत 54 षटकार लगावले आहेत.  तंझीद अभिषेक शर्मापेक्षा पुढे आहे. 

टीम इंडिया, पाकिस्तान आणि बांगलादेशच्या ओपनर्समध्ये आशिया कप स्पर्धेत षटकार मारण्यासाठी चुरस पाहायला मिळणार आहे. आशिया कप स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे.

आशिया कप पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक निर्धाव चेंडू टाकणारे गोलंदाज