टी20 वर्ल्डकप 2024 चं बिगुल वाजलं, 19 व्या संघाने घेतली एन्ट्री

28 November 2023

Created By: Rakesh Thakur

टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धा सहा महिन्यांनी होणार आहे. यासाठी आतापासून कंबर कसली जात आहे. 

या स्पर्धेत एकूण 20 संघ खेळणार असून 19 संघ ठरले आहेत. 

नामिबियाने सलग पाच सामने जिंकत वर्ल्डकपसाठी क्वालिफाय केलं आहे.

नामिबियाने तंजानियाला 58 धावांनी पराभूत करत वर्ल्डकपमध्ये एन्ट्री घेतली आहे.

आता एक संघ उरला असून रेसमधये झिम्बाब्वे, केनिया आणि युगांडा यांच्यात चुरस आहे.

भारत, वेस्ट इंडिज, अमेरिका, ऑस्ट्रेलिया इंग्लंड, न्यूझीलंड, नेदरलँड, पाकिस्तान, दक्षिण अफ्रिका हे संघ पात्र ठरले आहेत. 

श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलँड, पापुआ न्यू गिनी, कॅनाडा, नेपाळ, ओमान हे संघही पात्र आहेत.