नताशाने हार्दिक पांड्याबाबत उपस्थित केले प्रश्न? नेमकी काय म्हणाली..
27 ऑगस्ट 2024
Created By: राकेश ठाकुर
नताशा स्टॅन्कोविच आणि हार्दिक पांड्या यांचा घटस्फोट झाला आहे. मात्र नताशाच्या एका पोस्टने खळबळ उडाली आहे.
नताशाने इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. ही पोस्ट घटस्फोटाशी निगडीत असल्याचं मानलं जात आहे. पण यात काही स्पष्टता नाही.
नताशाने इंस्टास्टोरीत लिहिलं की, प्रेम सहनशील असते, दयाळू असते, अपमान करत नाही, प्रेम कधीही अपयशी ठरत नाही.
नकारात्मक गोष्टी प्रेमात होत नाही, असं सांगण्याचा नताशा पोस्टमधून प्रयत्न करते. पण ते कोणाला उद्देशून लिहिलं ते स्पष्ट नाही.
नताशा आणि हार्दिक जुलैमध्ये वेगळे झाले. सोशल मीडियावरून या दोघांनी वेगळं झाल्याचं सांगितलं.
पांड्याचा मुलगा अगस्त्य आई नताशासोबत राहात आहे. दोघेही सर्बियाला गेले आहेत.
पांड्या आणि नताशाने मे 2020 मध्ये कोर्ट मॅरेज केलं होतं. 30 जुलै 2020 दोघं आई-वडील झाले.