सॅनेटायझरची बॉटल आणि न्यूझीलंडच्या खेळाडूला बसला फटका, काय झालं वाचा
15 June 2024
Created By: Rakesh Thakur
आयसीसीने न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साउदीला दंड ठोठावला आहे.
साउदीने वर्ल्डकपमध्ये दोन सामने खेळले. त्यात पाच विकेट घेतल्या आणि संघ स्पर्धेबाहेर पडला. आता त्याचं नुकसान झालं आहे.
आयसीसीने टिम साउदीला दंड म्हणून सामना फीच्या 50 टक्के रक्कम कापली आहे.
टिम साउदीने गेल्या 24 महिन्यात पहिल्यांदाच अशी चूक केली आहे.
न्यूझीलंडचा संघ वेस्ट इंडिजविरुद्ध पराभूत झाला आणि टिम साउदीने आपला राग काढला.
आयसीसीने त्याला कलम 2.2 अंतर्गत लेव्हल 1 चा दोषी मानलं आणि साउदीने ते स्वीकारही केलं.
टीम साउदी 18 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. तंबूत परताना त्याने सॅनेटायझरच्या बॉटलवर जोराने हात मारला. यासाठी आयसीसीने दंड ठोठावला आहे.