भारताच्या कसोटी मालिकेवर पाकिस्तानच्या कोचने वर्तवलं भाकीत, म्हणाला..
17 सप्टेंबर 2024
Created By: राकेश ठाकुर
पाकिस्तानच्या कसोटी क्रिकेटची स्थिती वाईट असताना प्रशिक्षकाने भारताबाबत भाकीत वर्तवलं आहे.
पाकिस्तानचा कोच जेसन गिलेस्पीने भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेबाबत भविष्यवाणी केली आहे.
गिलेस्पीने सांगितलं की, या वेळेस ऑस्ट्रेलियाचं वजन जास्त आहे. आरामात भारताला पराभूत करू शकतो.
ऑस्ट्रेलियाकडे चांगले गोलंदाज आहेत आणि देशांतर्गत वातावरणात खेळण्याचा चांगला अनुभव आहे.
भारतीय संघ नोव्हेंबरमध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियात जाणारआहे. मागच्या दोन पर्वात भारताने विजय मिळवलेला.
भारतीय संघ सध्या बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी सज्ज आहे. 19 सप्टेंबरला पहिला कसोटी सामना आहे.
पाकिस्तानचा कोच म्हणून जेसन गिलेस्पीची पहिला मालिका वाईट गेली. बांगलादेशने पराभवाचं पाणी पाजलं.