वार्षिक करारातून 8 खेळाडूंचा पत्ता कट, पीसीबीचा मोठा निर्णय

19 ऑगस्ट 2025

Created By:  संजय पाटील

पीसीबीकडून 2025-2026 या वर्षासाठी वार्षिक कराराची घोषणा करण्यात आली आहे.

पीसीबीने वार्षिक करारातून एकूण 8 खेळाडूंना बाहेर केलं आहे. त्यात काही स्टार खेळाडूंचा समावेश आहे.

पीसीबीने आमिर जमाल, हसीबुल्लाह आणि कामरान गुलाम यांना वार्षिक करारातून वगळलं आहे. 

तसेच मीर हामजा, मोहम्मद अली आणि मोहम्मद हुरैरा यांनाही वगळलं आहे. 

उस्मान खान आणि मोहम्मद इरफान खान या दोघांचीही वार्षिक करारासाठी निवड करण्यात आली नाही. 

पीसीबीने बाबर आझम, मोहम्मद रिझवान, शाहीन अफ्रिदी, शान मसूद आणि नसीम शाह याचं डिमोशन केलं आहे. 

पीसीबीने ए कॅटेगरीमध्ये कोणत्याच खेळाडूला स्थान दिलेलं नाही. त्यामुळे बाबर, रिझवान, शाहीन या खेळाडूंचं वेतन कमी होणार हे निश्चित आहे.

अनाया बांगर दिसणार नव्या भूमिकेत, अखेर घेतला मोठा निर्णय