पीसीबीने फिक्सर सलमान बटचा निवड समितीमध्ये केला समावेश

1 December 2023

Created By: Rakesh Thakur

सलमान बटचा निवड समितीत समावेश झाल्याने वाद सुरू झाला आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी निवड समितीत समावेश करण्यात आला आहे.

स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात पाच वर्षांच्या बंदीची शिक्षा भोगल्यानंतर 39 वर्षीय बट 2016 मध्ये क्रिकेटमध्ये परतला.

ऑगस्ट 2010 मध्ये पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यादरम्यान स्पॉट फिक्सिंग केली होती.

2016 नंतर देशांतर्गत स्पर्धांमध्ये खूप यश मिळवले पण पुन्हा राष्ट्रीय संघात स्थान मिळवू शकला नाही.

कामरान अकमल, राव इफ्तिखार अंजुम यांची मुख्य निवडकर्ता वहाब रियाझ यांचे सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे.

विश्वचषकानंतर पाकिस्तानने अनेक मोठे बदल केले. कर्णधार बाबर आझम, प्रशिक्षकापासून निवड समितीपर्यंत बदल करण्यात आले आहेत.