पाकिस्तान क्रिकेट बोर्ड बाबर आझम याला पु्न्हा हटवणार?
7 सप्टेंबर 2024
Created By: संजय पाटील
पाकिस्तान क्रिकेट टीममध्ये पु्न्हा एकदा कॅप्टन्सीवरुन सर्कस सुरु झालंय, आता पुन्हा बाबर आझम निशाण्यावर आहे
बाबरला टी 20i वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीमुळे पुन्हा एकदा हटवलं जाऊ शकतं
पाकिस्तानी मीडियानुसार, बाबरला कर्णधापदावरुन हटवण्याचे संकेत मिळाले आहेत
पीसीबीकडून नुकतंच चॅम्पियन्स वनडे कप 5 ची घोषणा, मात्र बाबरला कोणत्याच संघाचं कर्णधारपद नाही
जिओ टीव्हीच्या पीसीबीतील सूत्रांनुसार, बाबर ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी20i सीरिजमध्ये कॅप्टन नसणार
कर्णधारपदाच्या शर्यतीत अनुभवी विकेटकीपर फलंदाज मोहम्मद रिझवान याचं नाव आघाडीवर
बाबरला गेल्या वर्षी वनडे वर्ल्ड कपमधील कामगिरीमुळे तिन्ही फॉर्मेटमधून नेतृत्व सोडावं लागलेलं, मात्र बाबरला पुन्हा टी20i कॅप्टन केलं गेलं