कानपूर कसोटीनंतर आर अश्विनने संबोधलं सिरीयल किलर!
1 ऑक्टोबर 2024
Created By: राकेश ठाकुर
भारताने कानपूर कसोटी सामना 7 विकेट्स राखून जिंकला. तसेच बांगलादेशला 2-0 ने मात दिली.
आर अश्विनने या मालिकेत चमकदार कामगिरी केली. त्याने एकूण 11 गडी बाद केले आणि 114 धावाही केल्या.
मालिकावीराचा पुरस्कार मिळाल्यानंतर अश्विनला सिरीयल किलर म्हणून संबोधलं गेलं. सामन्यानंतर मस्करीत असं सांगितलं गेलं.
सबा करीमने अश्विनला प्रश्न विचारला की, मालिकावीराच्या ट्रॉफी ठेवतो कुठे? त्यावर अश्विन म्हणाला की, मला असं वाटतं की मी सिरीयल किलर आहे.
अश्विनच्या उत्तरानंतर सबा करीमने सांगितलं की, तू फलंदाजांचा सिरीयल किलर आहेस.
आर अश्विनने 39 कसोटी मालिकेत 11 वेळा मालिकावीराचा पुरस्कार मिळवला आहे. तर मुरलीधरने 60 कसोटी मालिकेत ही कामगिरी केली आहे.
भारत आणि बांगालदेश यांच्यात दुसरा कसोटी सामना कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियममध्ये सुरु आहे.