आर अश्विनला शतकी खेळीनंतर मोठा झटका
20 सप्टेंबर 2024
Created By: संजय पाटील
भारताकडे बांगलादेश विरूद्ध पहिल्या कसोटीतील दुसऱ्या दिवसापर्यंत 308 धावांची आघाडी, तिसऱ्या दिवशी चित्र स्पष्ट होणार
टीम इंडियाच्या मोठ्या आघाडीत अश्विनचं मोठं योगदान, अश्विनची पहिल्या डावात शतकी खेळी
अश्विनची घरच्या मैदानात 113 धावांची खेळी, भारताच्या पहिल्या डावात 376 धावा
बांगलादेश पहिल्या डावात 149 धावांवर ढेर, मात्र अश्विनला एकही विकेट नाही
चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये अश्विनला कसोटी सामन्यात विकेट न मिळण्याची ही दुसरी वेळ आहे
अश्विनला 2016 साली इंग्लंड विरुद्ध विकेट नव्हती मिळाली, 8 वर्षांनंतर पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती
अश्विनचा हा घरच्या मैदानातील सहावा कसोटी सामना आहे, त्याने आतापर्यंत या स्टेडियममध्ये 30 विकेट्स घेतल्या आहेत