द्रविडचा पुढे जाण्यास नकार; लक्ष्मणलाही मुख्य प्रशिक्षकपद नको..!

17 मे 2024

Created By : राकेश ठाकुर

टी20 विश्वचषकानंतर विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविडचा कार्यकाळ संपणार आहे. त्यानंतर मुख्य प्रशिक्षक कोण असेल, याची उत्सुकता वाढली आहे.

बीसीसीआयने नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध करून मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले होते. इच्छुक उमेदवार 27 मे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज करू शकतात.

नवे प्रशिक्षक 1 जुलै 2024 पासून पदभार स्वीकारतील आणि त्यांचा कार्यकाळ 2027 अखेरपर्यंत राहील.कार्यकाळ 3.5 वर्षांचा आहे.

नवीन मुख्य प्रशिक्षकाच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी 2025, 2025 आणि 2027 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल, 2026 टी20 वर्ल्ड कप आणि 2027 एकदिवसीय वर्ल्ड कप खेळेल.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, द्रविड वैयक्तिक कारणांमुळे करारावर स्वाक्षरी करण्यास तयार नाही.व्हीव्हीएस लक्ष्मणही अर्ज करण्यास इच्छुक नसल्याची माहिती आहे.

न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंगचे नाव आघाडीवर आहे.

फ्लेमिंग सध्या चेन्नईचा मुख्य प्रशिक्षक असून त्याच्या प्रशिक्षणाखाली संघाने पाच वेळा ट्रॉफी जिंकली आहे.