रजत पाटीदारने पुन्हा करून दाखवलं, आरसीबीनंतर या संघाला अंतिम फेरीत नेलं

7 सप्टेंबर 2025

Created By:  राकेश ठाकुर

रजत पाटीदार  टीम इंडियामध्ये पुनरागमनासाठी धडपड करत आहे. असं असलं तरी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सतत फलंदाजीचे कौशल्य दाखवत आहे.

मध्य प्रदेशला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम फेरीत, आरसीबीला आयपीएल जेतेपद आणि पाटीदारची धुरा आता दुलीप ट्रॉफीमध्येही दिसून आली आहे.

रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील सेंट्रल झोनने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.  अंतिम फेरीत त्यांचा सामना साउथ झोनशी होईल.

उपांत्य फेरीत सेंट्रल झोनने आपल्या मजबूत फलंदाजी आणि धारदार गोलंदाजीच्या जोरावर बलवान वेस्ट झोनला गुडघे टेकवण्यास भाग पाडलं.

दुलीप ट्रॉफी 2025 मध्ये रजत पाटीदारने सेंट्रल झोनची जबाबदारी स्वीकारली आणि अंतिम फेरीही गाठली. 

पहिल्या डावात वेस्ट झोनला 438 धावांवर रोखल्यानंतर, सेंट्रल झोनने पहिल्या डावात 600 धावा केल्या. त्यामुळे सामना ड्रॉ झाला तर सेंट्रल झोनला अंतिम फेरीचं तिकीट मिळालं.

सेंट्रल झोनकडून सहा फलंदाजांनी अर्धशतके केली. कर्णधार पाटीदारने स्वतः 77 धावांची खेळी खेळली, तर शुभम शर्माने सर्वाधिक 96 धावा केल्या.

आशिया कप स्पर्धेपूर्वी गोलंदाजाने रचला इतिहास, केलं असं की...