वैभव सूर्यवंशीला कमी वयात आणखी मोठा मान, युवा फलंदाजाने काय केलं?

27 ऑक्टोबर 2025

Created By:  संजय पाटील

वैभव सूर्यवंशी याने रणजी ट्रॉफी स्पर्धेत युवा खेळाडूला डेब्यू कॅप दिली.

रणजी ट्रॉफी स्पर्धेतील दुसऱ्या फेरीत बिहारचा फलंदाज वैभव सूर्यवंशीने याला मणिपूर विरूद्धच्या सामन्याआधी मोठा बहुमान मिळाला. 

ऑलराउंडर सचिन कुमार याने मणिपूर विरूद्धच्या सामन्यातून फर्स्ट क्लास पदार्पण केलं.

उपकर्णधार वैभव सूर्यवंशी याने सचिनला डेब्यू कॅप दिली आणि त्याचं संघात स्वागत केलं.

अनुभवी खेळाडूकडून डेब्यू करणाऱ्याला कॅप दिली जाते. मात्र हाच बहुमान 14 व्या वर्षी वैभवला मिळाला. वैभवसाठी हा क्षण अविस्मरणीय असा ठरला. 

सचिनने पहिल्या दिवशी उल्लेखनीय कामगिरी केली. सचिनने 9 ओव्हरमध्ये 46 धावांच्या मोबदल्यात 2 विकेट्स मिळवल्या.

वैभवला रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या पहिल्या फेरीत काही खास करता आलं नाही. त्यामुळे वैभवकडून दुसऱ्या फेरीत मोठ्या खेळीची आशा असणार आहे. 

हाच खरा 'फॅमिली मॅन'; 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीच्या दिवाळीच्या फोटोंवर नेटकऱ्यांचे कमेंट्स