राशिद खानने 1.66 कोटींवर सोडलं पाणी, ऑस्ट्रेलियाला दिला धक्का
19 ऑगस्ट 2024
Created By: राकेश ठाकुर
अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खान टी20 क्रिकेटमधील जबरदस्त खेळाडू आहे. जवळपास सर्वच लीग स्पर्धेत खेळतो.
राशिद खान 446 टी20 सामने खेळला असून त्यात त्याने 610 विकेट्स घेतल्या आहेत.
आयपीएल स्पर्धेत त्याने 121 सामने खेळले असून 149 विकेट घेतल्या आहेत.
राशिद खान गोलंदाजीसोबत मधल्या फळीत फलंदाजीही करतो. त्यामुळे संघात घेण्यासाठी चढाओढ असते.
बिग बॅश लीगमधील सर्वात महागडा विदेशी खेळाडू आहे. पण राशिदने ड्राफ्ट आधीच नाव मागे घेतलं आहे.
2023 मध्येही राशिद खानने नाव मागे घेतलं होतं. तेव्हा ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानसोबत खेळण्यास नकार दिला होता.
बिग बॅशमध्ये एडिलेट स्ट्रायकर्सकडून खेळत होता. त्याचा पगार 1.66 कोटी होता. मात्र त्याने त्यावर पाणी सोडलं आहे.