विराट कोहलीची IPL Final मधील कामगिरी कशी?
2 जून 2025
Created By: संजय पाटील
आयपीएल 2025 मधील अंतिम सामन्यात पीबीकेस विरुद्ध आरसीबी आमनेसामने असणार आहेत. आरसीबीची अंतिम फेरीत पोहचण्याची ही चौथी तर पंजाबची दुसरी वेळ आहे.
अंतिम सामना 3 जून रोजी अहमदाबादमध्ये होणार आहे. या निमित्ताने विराटने याआधीच्या अंतिम फेरीतील 3 सामन्यात किती धावा केल्या? जाणून घेऊयात.
विराट 2008 पासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळतोय. विराट आरसीबीकडून तिन्ही अंतिम सामन्यात खेळलाय
विराटने 2009 साली अंतिम फेरीत डेक्कन चार्जर्स विरुद्ध 8 बॉलमध्ये 7 रन्स केल्या होत्या.
विराटने 2011 साली फायनलमध्ये सीएसके विरुद्ध 32 बॉलमध्ये 35 रन्स केल्या होत्या.
विराटने 2016 साली सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध फायनलमध्ये 35 बॉलमध्ये 54 रन्स केल्या.
विराटने अशाप्रकारे आयपीएल इतिहासात 3 अंतिम सामन्यांमध्ये एकूण 96 रन्स केल्या आहेत.
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा