आयपीएल 2024 साठी आरसीबीची या सहा खेळाडूंवर असेल नजर!

7 December 2023

Created By: Rakesh Thakur

मिचेल स्टार्क याच्यावर आरसीबीची नजर असेल. हेझलवूड आणि हर्षल पटेल यांना रिलीज केल्यानंतर त्याची गरज आहे. 

मिचेल स्टार्क आयपीएल 2015 ते 2015 आरसीबीकडून खेळला होता. त्याने 27 सामन्यात 34 गडी बाद केले होते.

अफगाणिस्तानचा मुजीब उर रहमान हा उत्तम फिरकीपटू आहे. वनिंदू हसरंगाच्या जागी त्याची निवड होऊ शकते.

मुजीब उर रहमानने टी20 6.7 च्या इकॉनॉमी रेटने 244 गडी बाद केले आहेत. 

वनिंदू हसरंगाच्या जागी आदिल रशीदची निवड उत्तम ठरू शकते.

रचिन रविंद्रने वनडे वर्ल्डकप 2023 मध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. टॉप ऑर्डरसाठी उत्तम पर्याय ठरेल. 

शाहरुख खान हा देखील उत्तम पर्याय ठरू शकतो. मधल्या फळीत त्याची गरज आहे. 

आरसीबी कार्तिक त्यागीवरही नजर ठेवून आहे. वेगवान गोलंदाजीच्या ताफ्यात त्याचा उपयोग होईल.