11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

इंग्लंडविरुद्ध बुमराहने वापरली ही युक्ती, सामन्यानंतर सांगितलं सिक्रेट

3 फेब्रुवारी 2024

Created By: Rakesh Thakur

भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणमच्या येथे सुरु आहे.

कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपूर्णपणे टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या नावावर राहीला.

जसप्रीत बुमराहने 15.5 षटकात केवळ 45 धावा देत 6 विकेट घेतल्या. निम्मा संघ तंबूत पाठवला.

बुमराहच्या भेदक गोलंदाजीमुळे भारतीय संघाला पहिल्या डावाच्या जोरावर 143 धावांची आघाडी मिळवता आली.

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर बुमराहनेही आपल्या शानदार गोलंदाजीचे रहस्य उलगडले.

जसप्रीत बुमराह म्हणाला की, चेंडू रिव्हर्स स्विंग होत होता आणि त्याचा योग्य तो फायदा झाला.

पोपची विकेट घेतल्यानंतर पुढचा फलंदाज इनस्विंग यॉर्करसाठी आधीच तयार असेल याची मला कल्पना होती.