रिंकू-सॅमसनची दुलीप ट्रॉफीसाठी निवड नाही, या खेळाडूला कायमचं बसवलं!
14 ऑगस्ट 2024
Created By: राकेश ठाकुर
देशांतर्गत दुलीप ट्रॉफी स्पर्धा 5 सप्टेंबरपासून सुरु होत आहे. या स्पर्धेत चार संघ सहभागी होणार आहेत.
दुलीप ट्रॉफीत दिग्गज खेळाडू खेळताना दिसणार आहेत. रवींद्र जडेजा, गिल, श्रेयस अय्यर, पंत, जयस्वाल खेळणार आहेत.
रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळणार असल्याची चर्चा रंगली होती. पण संघाची घोषणा झाल्यानंतर खेळणार नसल्याचं स्पष्ट आहे.
दुलीप ट्रॉफीतून इशान किशन कमबॅक करत आहे. गेल्या 9 महिन्यांपासून संघाबाहेर असलेल्या इशानला संधी मिळाली आहे.
दुलीप ट्रॉफीत संजू सॅमसन आणि रिंकु सिंह यांची निवड झाली नाही. त्यामुळे या दोघांबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.
दुसरीकडे, दुलीप ट्रॉफीत पृथ्वी शॉची निवड झाली नाही. गेल्या तीन वर्षांपासून पृथ्वी शॉ टीम इंडियाबाहेर आहे.
रिंकु आणि सॅमसनला दुलीप ट्रॉफीत संधी मिळू शकते. कारण बांगलादेशविरुद्ध संघाची घोषणा होताच या खेळाडूंना रिप्लेसमेंट मिळेल.