रिंकु सिंहने हातावर गोंदवला खास टॅटू
24 सप्टेंबर 2024
Created By: राकेश ठाकुर
टीम इंडियातील खेळाडूंमध्ये टॅटूचा क्रेझ काही नवा नाही. आता या पंगतीत रिंकु सिंहही बसला आहे.
रिंकु सिंहने आपल्या डाव्या हातावर टॅटू गोंदवला आहे. याबाबतचा फोटोही शेअर केला आहे.
रिंकु सिंहने आपल्या डाव्या हातावर 'Gods Plan' असं लिहिलं आहे.
रिंकु सिंहने राघव शेट्टीकडून हा टॅटू गोंदवून घेतला आहे. राघव प्रोफेशनल टॅटू आर्टिस्ट आहे.
रिंकु सिंहने टॅटूसाठी राघव शेट्टीचे आभार मानले आहेत.
रिंकु सिंह सध्या टीम इंडियापासून दूर आहे. बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेत दिसण्याची शक्यता आहे.
रिंकु सिंह व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये मोठं नाव आहे. तसेच टीम इंडियाचा आश्वासक चेहरा आहे.