ऋषभ पंत टीम इंडियाकडून खेळण्यास सज्ज, या सामन्याद्वारे करणार पुनरागमन

ऋषभ पंच याचा डिसेंबर 2022 मध्ये कार अपघात झाला होता. यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. 

ऋषभ पंत कमबॅकसाठी सज्ज झाला आहे. पंतचा सराव सुरू असून लय सापडत आहे. 

ऋषभ पंत या वर्षीच्या शेवटी किंवा जानेवारी 2024 मध्ये पुनरागमन करेल. 

पंत सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सराव करत आहे. 

इनसाइड स्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार, पंत देशांतर्गत क्रिकेटमधून पुनरागमन करणार आहे.

जानेवारीमध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतून पुनरागमन करेल अशी शक्यता आहे.