शतकी खेळी व्यर्थ गेल्यानंतर ऋतुराजने सांगितलं पराभवाचं कारण

29 November 2023

Created By: Rakesh Thakur

तिसऱ्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 5 विकेटने पराभव केला.

प्रथम फलंदाजी करताना भारताने 223 धावांचे लक्ष्य दिले होते.

मॅक्सवेलने अखेरच्या चेंडूवर दोन धावा आवश्यक असताना चौकार मारून विजय मिळवला.

शतकवीर ऋतुराज गायकवाडने पराभवाचे कारण सांगितले.

आउटफिल्ड इतकं ओलं झाले होते की चेंडू पकडणे कठीण झालं होतं.

या परिस्थितीमुळे डेथ ओव्हर्समध्ये आमचे गोलंदाज महागडे ठरले.

या परिस्थितीत प्रत्येक षटकात 12, 13 किंवा 14 धावाही होऊ शकतात.