टीम इंडियाच्या विजयाच्या आनंदात रोहित शर्माला बसला धक्का, झालं असं की..
2 ऑक्टोबर 2024
Created By: राकेश ठाकुर
भारताने बांगलादेशविरुद्धची दोन सामन्याची कसोटी मालिका 2-0 ने जिंकत क्लीन स्वीप दिला.
मालिकेत रोहित शर्माने व्यवस्थितरित्या कर्णधारपद भूषवलं. पण एक फलंदाज म्हणून त्याच्या पदरी निराशा पडली आहे.
रोहित शर्माने दोन सामन्यांच्या 4 डावात 10.50 च्या सरासरीने 42 धावा केल्या.23 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या राहिली.
फलंदाजीतील खराब कामगिरीचा फटका रोहित शर्माला बसला आहे. आंतरराष्ट्रीय क्रमवारीत मोठं नुकसान झालं आहे.
मालिका सुरु होण्यापूर्वी रोहित शर्मा टॉप 5 मध्ये होता. पण मालिका संपताच पहिल्या 10 मधून आऊट झाला आहे.
आयसीसीच्या नव्या क्रमावारीत रोहित शर्माची घसरण थेट 15व्या स्थानावर झाली आहे. या मालिकेत त्या 10 क्रमांकाचं नुकसान झालं.
टीम इंडिया 16 ऑक्टोबरपासून न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेत रोहितच्या कामगिरीकडे लक्ष असेल.