20 फेब्रुवारी 2025

रोहित शर्माने केला 11 हजार धावांचा विक्रम, सचिनला टाकलं मागे

रोहितने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 11 हजार धावा पूर्ण केल्या. रोहितला हा टप्पा गाठण्यासाठी 12 धावांची आवश्यकता होती

रोहित शर्मा हा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 11 हजार धावांचा टप्पा गाठणारा दहावा फलंदाज आहे.

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात रोहितने 36 चेंडूत 41 धावा केल्या, ज्यात सात चौकारांचा समावेश होता.

अशी कामगिरी करणारा तो भारताचा चौथा फलंदाज आहे. रोहितपूर्वी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि विराट कोहलीने अशी कामगिरी केली आहे.

रोहित शर्मा हा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 11 हजार धावा पूर्ण करणारा दुसरा फलंदाज आहे.

रोहितने त्याच्या 261 व्या एकदिवसीय डावात 11 हजार धावा पूर्ण केल्या आहेत.

सर्वात जलद 11 हजार धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. कोहलीने फक्त 222 डावांमध्ये 11 हजार धावा पूर्ण केल्या.