श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात रोहित शर्माचा चौकारांचा विक्रम
2 ऑगस्ट 2024
Created By: राकेश ठाकुर
रोहित शर्माने 47 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 58 धावांची खेळी केली.
रोहित शर्माने वनडे क्रिकेटमध्ये हजार चौकार पूर्ण केले आहेत. सात चौकारांसह 1001 चौकार नावावर झाले आहेत.
वनडे क्रिकेटमध्ये 1000 चौकार मारणारा रोहित शर्मा हा पाचवा फलंदाज आहे.
यासह रोहित शर्मा सचिन तेंडुलकर, विराट कोहली, गांगुली आणि सेहवागच्या पंगतीत बसला आहे.
सचिन तेंडुलकरने वनडे क्रिकेटमध्ये एकूण 2016 चौकार मारले आहेत.
विराट कोहली दुसऱ्या स्थानावर असून त्याने 1294, गांगुली 1122 चौकारांसह तिसऱ्या, तर सेहवाग 1132 चौकारांसह चौथ्या स्थानी आहे.
रोहित शर्मा कर्णधार म्हणून सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. त्याने इयॉन मॉर्गनचा विक्रम मोडला.