29 ऑगस्ट 2025
Created By: राकेश ठाकुर
रोहित शर्मा गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळण्याची शक्यता आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडिया तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. यात रोहित शर्मा आणि विराट कोहली दिसू शकतो.
या मालिकेत खेळण्यासाठी रोहित शर्माला एक टेस्ट द्यावी लागणार आहे. ही टेस्ट 13 सप्टेंबरला होणार आहे.
ब्रोंको टेस्ट रग्बीमध्ये फिटनेस तपासण्यासाठी केली जाते. आता ही टेस्ट टीम इंडियातही होणार आहे.
रोहित शर्माची ब्रोंको टेस्ट बीसीसीआयच्या बंगळुरु येथील सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये होणार आहे.
या टेस्टमध्ये 20 मीटर शटल शर्यत असते. यानंतर 40 मीटर आणि 60 मीटर धावावं लागतं.
रोहित शर्मा सध्या मुंबईत फिटनेसवर काम करत आहे. टीम इंडियाचे माजी कोच अभिषेक नायर त्याची मदत करत आहे.