बांगलादेशविरुद्ध कसोटीत रोहित शर्माचा नकोसा विक्रम, काय ते जाणून घ्या
13 ऑगस्ट 2024
Created By: राकेश ठाकुर
टीम इंडिया सप्टेंबर महिन्यात बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.
पहिला कसोटी सामना 19 ते 23 सप्टेंबर, दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरदरम्यान आहे.
बांगलादेशविरुद्ध रोहित शर्माचा रेकॉर्ड काही खास नाही. तीन टेस्टच्या तीन डावात फक्त 33 धावा केल्यात.
दोन डावात दुहेरी आकडाही गाठता आला नाही. बांगलादेशविरुद्ध 21 ही सर्वोत्तम धावसंख्या आहे.
2019 मध्ये बांग्लादेश संघ भारत दौऱ्यावर होता तेव्हा रोहित शर्माने दोन कसोटी सामने खेळले. तर एक कसोटी 2015 खेळला होता.
या वर्षी रोहित शर्माने कसोटीत 11 डावात 45.50 च्या सरासरीने 455 धावा केल्या. दोन शतक आणि 1 अर्धशतक ठोकलं.
रोहित शर्मा 59 कसोटीत 101 डावात खेळला आहे. यात 45.46 च्या सरासरीने 4137 धावा केल्या. 12 शतकं आणि 17 अर्धशतकं ठोकली आहेत.