दुसऱ्या वनडेत रोहित शर्मा मोडणार धोनीच्या षटकारांचा विक्रम!

3 ऑगस्ट 2024

Created By: राकेश ठाकुर

रोहित शर्मा एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय कर्णधार ठरणार आहे.

महेंद्रसिंह धोनीसह रोहित शर्मा षटकारांच्या यादीत बरोबरीवर आहे.

कर्णधार रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्ध 43 षटकार मारले आहेत. 

महेंद्रसिंह धोनीने कर्णधार असताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध 43 षटकार मारले आहेत.

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात एक षटकार मारताच रोहित शर्माच्या नावावर विक्रम होणार आहे.

रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्ध 35 आणि महेंद्रसिंह धोनीने इंग्लंडविरुद्ध 33 षटकार मारेल आहे.

विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्ध 32 षटकार मारले आहेत.