8 मार्च 2025

रोहित शर्मा दुबईत रचणार महारेकॉर्ड, 79 धावा केल्या की झालं...

कर्णधार रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आतापर्यंत खेळलेल्या चार सामन्यांमध्ये काही खास करू शकलेला नाही.

रोहित शर्मा संघाला चांगली सुरुवात करून देतो पण त्याचे मोठ्या धावसंख्येत रूपांतर करण्यापूर्वीच बाद होतो.

आता अंतिम सामना असून सर्वांना भारतीय कर्णधाराकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.

रोहित शर्मा दुबईमध्ये एक मोठा विक्रम रचण्याच्या जवळ आहे.  त्यासाठी त्याला 79 धावांची आवश्यकता आहे.

रोहित शर्माने दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आतापर्यंत 421  धावा केल्या आहेत.

79 धावा करताच कर्णधार रोहित या मैदानावर 500 एकदिवसीय धावा करणारा इतिहासातील पहिला खेळाडू ठरेल.

दुसरीकडे, चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर रोहित शर्मा त्याच्या वनडे क्रिकेट भविष्याबद्दल निर्णय घेऊ शकतो, अशी चर्चा आहे.