टी20 वर्ल्डकप ट्रॉफी गणपती बाप्पााच्या चरणी
21 ऑगस्ट 2024
Created By: राकेश ठाकुर
मुंबई गणेशोत्सवाच्या तयारी सुरु असून लवकरच लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे.
गणेशोत्सवापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि बीसीसीआय सचिव जय शाह यांनी सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं.
रोहित शर्मा आणि जय शाह मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात गेले होते. त्यांनी सोबत टी20 वर्ल्डकप ट्रॉफीही नेली होती.
टी20 वर्ल्डकप ट्रॉफी गणपतीच्या चरणी ठेवली होती. या ट्रॉफीचं मंदिरातील पुजाऱ्यांनी पूजा केली.
रोहित आणि जय शाह यांनी सिद्धिविनायकचा प्रसाद घेतला. यावेळी काही अधिकारी तिथे उपस्थित होते.
टीम इंडियाने 29 जूनला बार्बाडोसमध्ये अंतिम सामन्यात दक्षिण अफ्रिकेचा पराभव करून जेतेपदावर नाव कोरलं होतं.
रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया पुढच्या महिन्यात बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.